आयुर्वेदात आवळ्याला महत्त्वाचे स्थान आहे. आवळा हे फळ बहुगुणी आहे. आवळा शिजवला तरी त्याचे गुणधर्म कमी होत नाहीत. आवळा शिजवला तरी त्याचे गुणधर्म कमी होत नाही.आवळ्यातल्या क जीवनसत्त्वामुळे सांधेदुखी’ केसगळती ‘पचनशक्ती वाढवणे व सौंदर्य टिकवणे यासाठी उपयोगी आहे. आवळ्याचा रस सकाळी उपाशीपोटी घेतल्यास पचनक्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आवळा खूप उपयोगी असून अनेक फायदे आहेत.
१)आवळा खाल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते.
२) आवळा शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रणात ठेवतो.
३) आवळ्यापासून कॕन्डी , ज्यूस , चूर्ण, मुरांबा , सुपारी, लोणचं बनवून वर्षभर टिकवून आहारात वापरता येतो.
४)आवळ्याचे फळ , पान व फुले यांचा औषध म्हणून वापर करता येतो.
५) उन्हळ्यामुळे होणारा त्रास व हृदयविकाराचा त्रास यावर आवळा गुणकारी आहे.
६) आवळ्यामुळे स्मरणशक्ती वाढते. तसेच डोळ्याचे विकार बरे होतात.
७) आवळ्याचा रस , गूळ व सुःठपावडर यांचे मिश्रण घेतल्यास सांधेदुखी बरी होते.
अशा प्रकारे संपूर्ण आरोग्यासाठी वर्षभर आवळ्याचे वेगवेगळ्या स्वरूपात सेवन केल्यास आवळा आरोग्यासाठी बहुगुणी ठरतो.