शिवसेना खासदार संजय राहूत यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आवाज उठवला आहे, त्यांनी संजय राहूत यांच्यावर मुस्कटबादी होत असल्याचा आरोप केला आहे. पांडुरंग रायकर या पत्रकारांचा मृत्यू कॉव्हिड मुले झाला तरी देखील त्यांच्या कुटुंबाकडे सरकारच लक्ष नाही. असं चित्र यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी वारकऱ्यांचा भगवा खांद्यावर घेवून जाणाऱ्या वारकऱ्याला पोलीस एका गुन्हेगारासारखी वागणूक देतात. संजयजी, ही मुस्कदाबी नाहीतर दुसरं काय? असा सवाल केला.
दरम्यान, चित्रा यांनी त्यांच्या ट्विट अकाऊंट वरून तुम्ही तुमचं हिंदूत्त्व काँग्रेसच्या खुंटीला अडकवून ठेवलं, असा घणाघात वाघ यांनी शिवसेनेवर केला. याबाबतचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. संजय राऊत यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांची तुलना कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस यांच्यासोबत केली होती. त्यावरुनही, वाघ यांनी संजय राऊत यांना सुनावले. पुढे त्या म्हणाल्या तुम्हालाही काँग्रेस राष्ट्रवादीचे आभार मानायची संधी मिळेल. तुम्ही केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याबद्दल जे काही बरळलात, त्याआधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामना संपादकपदाचा काय संबंध आहे ते सांगा.