टक्कल पडणे, जे अलोपेशियाचे दुसरे नाव आहे, म्हणजे डोक्यावरील त्वचेपासून (टाळू) केस गळणे. थोड्याफार प्रमाणात केस गळणे ही बऱ्याच लोकांमध्ये अगदी सामान्य बाब आहे कारण ते पुन्हा उगवतात.
१) २-३ लसण्याच्या पाकळ्या डोळ्याला लावायच्या सुरम्या बरोबर खरळीत वाटाव्या. या चटणीला टक्कल पडलेल्या भागावर लावावे. जळजळ झाली तर अगोदर तूप किंवा लोणी लावून मग त्यावर हा लेप लावावा. कराव २0-३0 दिवस हा लेप दररोज करावा.
२) दिवसातून २-३ वेळा कोथिंबिरीच्या रसाचा मसाज केल्याने काही दिवसातच फायदा होतो.
३) २ थेंब शिसम तेल नाकपूडयांमध्ये सोडा आणि स्वास घ्या. यामुळे बंद झालेली केसांची मुळे उघडण्यास मदत होवून केस पूनःच्च येण्यास मदत होते.
४) १.जठामांसी : १०० ग्राम २. चेन्गल्वा कोस्तु : १०० ग्राम ३.काले शिसम : १०० ग्राम ४.सुगंध फळ मुळ : १०० ग्राम ५.तमारा गीन्जलू : १०० ग्राम हे सगळे एकत्र करून थोड्या पाण्याने वाटा आणि त्याची पेस्ट तयार करा. त्यामध्ये ५०० ग्राम गाईचे तूप घाला आणि मंद आचेवर उकळा. नंतर तूप शिल्लक राहीपर्यंत उकळून झाल्यावर ते गाळून घ्या आणि बाटलीत भरून ठेवा आणि वापरा. हे तयार झालेले तूप रोज किंवा आठवड्यातून दोन दिवस वापरा. टक्कल पडण्याचे प्रमाण कमी होईल.
५) डोक्यावर जेथे केस नसतील अशा ठिकाणची त्वचा ताणून धरा आणि तेथे केसांच्या मुळाना मुळयाचा रस लावा. हे झोपण्यापूर्वी करा. त्यामुळे तो रस सर्वत्र डोक्यावर पसरून जेथे केसाच्या मुलांना अवरोध निर्माण झाला आहे तेथून तो आतमध्ये पाझरून केसांची मुले जी अवरोधित झालेली आहेत, त्यांना मोकळे करण्यास मदत करेल. सकाळी उठून आयुर्वेदीक शाम्पूने स्नान करा. यामुळे देखील पून:च्च केस येण्यास मदतच होईल.