‘द राईट वन’ चा प्रीमियर नुकताच एमएक्स प्लेयरवर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सागर लाधे आहे.या चित्रपटात मराठीतील गाजलेली मालिका ‘काहे दिया परदेस’ यातील ऋषी सक्सेना यांची मुख्य भूमिका आहे.
दिग्दर्शक सागर लाधे यांनी फिल्म बद्दल असे सांगितले आहे की “हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो. तरुण प्रेक्षांची या चित्रपटाला मिळालेल्या पसंतीने आम्ही खूप आनंदित आहोत. दिग्दर्शक म्हणून अशा कधिक चित्रपट बनवण्याची प्रेरणा आम्हाला यातून मिळते.”
मराठीतील गाजलेल्या ‘काही दिया परदेस’ या मालिकेतील अभिनेता ऋषी सक्सेना याने असे म्हटले आहे की “मी खरंच आनंदी आहे की मला या चित्रपटासोबत जोडण्याची संधी मिळाली. मी दिशांत च्या व्यक्तरेखेच्या खूप जवळ होतो. सागर हा खूप उत्कृष्ट दिग्दर्शक आहे आणि त्याने दिशांतच्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय दिला आहे.”
आता दिग्दर्शक व निर्माते याचा दुसरा भाग बनवण्याबाबत विचार केला आहे.दिग्दर्शक सागर लाधे यांच्या दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती चंद्रकांत हिरे आणि ब्लॅकबोर्ड मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. ‘द राईट वन’ आता एमएक्स प्लेयरवर बघायला उपलब्ध आहे.