अनेकजण दिवसभर काम करून रात्रीच्या वेळेस घरी पोहचतात. अशावेळेस जेवणानंतर टीव्हीसमोर लोळतच झोपी जातात.शरीराची हालचाल न झाल्याने त्यामधूनच अनेक रोग, आजार वाढतात.बसून काम करण्याची जीवनशैली आणि धकाधकीचं जीवन यामधून अनेकांना व्यायाम करण्याचा वेळ मिळत नाही. मग जेवणानंतर किमान १५-२० मिनिटं वेळ काढून चालण्याची सवय ठेवा.
१) रात्रीच्या जेवणानंतर किमान पंधरा मिनिटं चालल्यानंतर अन्नाचे पचन होण्यास मदत होते. पित्ताचा त्रास होत नाही.
२) आजकाल अनेकांना निद्रानाशाची समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी औषध गोळ्यांऐवजी काही योगासन आणि चालण्याची सवय फायदेशीर ठरते.
३) जेवणानंतर रात्रीच्या वेळेस १५ मिनिटं चालल्यास हा व्यायामाचा एक उत्तम भाग असू शकतो.
४) शतपावली केल्यास अचानक रक्तातील वाढणार्या साखरेचं प्रमाण आटोक्यात राहते.
५) जेवणानंतर चालल्यास तुमचे वजन आटोक्यात राहते. अनावश्यक कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
६) डाएटच्या सोबतीने किमान चालण्याचा व्यायाम केल्यास वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
७) शरीराचे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तुमचा मेटॅबॉलिझम रेट महत्त्वाची भूमिका पार पाडतो. शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी चालणं आवश्यक आहे.