दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, परंतु दूध हे आपल्या आरोग्यासाठी महागात पडू शकते. भेसयुक्त दूध हे त्याचे मुख्य कारण आहे. त्याचप्रमाणे भेसळ नसलेले दुधही जास्त पिणे आपल्याला महागात पडू शकते.
१. दुध हे यकृत आणि मूत्रपिंडासाठी धोकादायक ठरू शकते. जर भेसळयुक्त दूध किंवा त्याच्या प्रोडक्ट्सचा वापर सलग दोन वर्षे केला गेला तर ते आपल्या इंटेस्टाइन, यकृत आणि मूत्रपिंडाचेच नुकसान करीत नाही तर इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.
२. दुधाच्या अतिसेवनाने पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते, तसेच गॅसचा देखील त्रास होऊ शकतो
३. एका अभ्यासानुसार वृद्ध लोकांमध्ये दुधाचे आणि दुग्धजन्य पदार्थांचे दररोज सेवन केल्याने अशक्तपणा आणि सरकोपेनियाचा धोका कमी होतो.
४. जास्त प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कधीकधी मळमळ, अस्वस्थता, थकवा आणि सुस्तपणा येऊ शकतो.
५. भेसायुक्त दुधामध्ये ए १ केसीन असते, ज्यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होते आणि बॅक्टेरियांना प्रोत्साहन मिळते.