राजकुमार हा सिनेमा युट्यूबर प्रदर्शित केला आहे. एस आर एफ टॉकीज यू ट्यूब चॅनेल वर राजकुमार प्रदर्शित केला आहे. हा सिनेमा निर्मात्यांनी वेगळ्या स्वरूपात रिलीज केला आहे, तो म्हणजे तुम्ही आधी सिनेमा बघा, बघुन झाल्यावर पैसे द्या, असा एक आगळा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे.
‘राजकुमार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन समर्थ राज इडिगा यांनी केली आहे. त्यांनी असे सांगितले आहे की, लॉकडाऊनमुळे थेटर बंद आहेत. त्यामुळे निर्माते मोठ्या अडचणीत आले आहेत. राजकुमार हा मोठ्या बजेट आणि स्टारकास्टचा सिनेमा युट्युब चॅनेलला रिलीज करण्याचे धाडस आम्ही फक्त प्रेक्षकांच्या भरवशावर दाखवले आहे’.
अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. त्याच्यासोबत बबन चित्रपटातील गायत्री जाधव, प्रवीण तरडे, देविका दफ्तरदार, राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार श्रीनिवास पोकळे आणि केजीएफ फेम अर्चना जॉईस हे कलाकार देखील राजकुमार चित्रपटात दिसणार आहेत.