वेलचीची तत्त्वे त्वचा संक्रमण दूर करण्यास मदत करतात. वेलचीच्या सुगंधी स्वादामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होण्यास मदत तर होतेच, पण ती त्वचेचे आरोग्य सुधारण्यासही मदत करते.वेलचीचे नियमित सेवन केल्याने त्वचेचे आजार दूर होतात व त्वचा चमकदार होते. ओठ वाळू लागल्यास किंवा फाटून त्यातून रक्त येत असल्यास वेलची मदत करेल.
यासाठी एक वेलची बारीक वाटून त्यात लोणी मिसळावे. दिवसातून दोनदा ही पेस्ट ओठांवर लावावी. यामुळे ओठ मुलायम होतील व त्यांना नैसर्गिक गुलाबी रंग येईल. वेलचीच्या पूडमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर स्क्रब केल्यास त्वचा चांगली स्वच्छ होते. दररोज वेलची खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.