कोरोना साथीच्या विरोधातील लढाईत महाराष्ट्राने सोमवारी महत्त्वाचा टप्पा पार केला. राज्यभरात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्याचा विक्रम राज्याने सोमवारी नोंदवला .लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दखल घेऊन आरोग्य यंत्रणांची कौतुक केले आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले .दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी ६४ हजार ३०८ एवढी होती.
लसीकरणा मध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावं नोंदवली जात आहे आतापर्यंत राज्यातील तीन कोटी १६ लाख ९ हजार २२७ नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे .तर सोमवारी दोन्ही लॉस मात्रा घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, अशी माहिती आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी दिली .राज्यात सोमवारी सुमारे चार हजार शंभर लसीकरण केंद्रे सुरू होऊन सुरू होती. आणि त्याद्वारे सायंकाळी चार वाजेपर्यंत तीन लाख ७५ हजार ९७४ नागरिकांचे लसीकरण झाले .संध्याकाळी उशिरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते असे डॉक्टर व्यास यांनी सांगितले.
दरम्यान, या लसीकरण मोहिमेमुळे येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा जास्त प्रादुर्भाव नागरिकांना होणार नाही. असाही विश्वास व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांमध्ये आता कोणाची भीती कमी झालेली आहे कारण एक कोटी नागरिकांना दोन लस मात्रा दिल्यामुळे नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झालेली आहे.