125 सीसीच्या बाईक्स भारतात जास्त प्रमाणात वापरल्या जातात आणि पसंत केल्या जातात. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर या जुन्या बाईकला नवीन अवतारात बाजारात आणणार आहे.
टीव्हीएस मोटरची लोकप्रिय दुचाकी वाहन लवकरच नवीन अवतारात बाजारात आणण्याची शक्यता आहे. माहितीनुसार कंपनी फिअरो 125 बाइक भारतीय बाजारात लवकर आणू शकते. टीव्हीएसने गेल्या वर्षी या बाईकसाठी ट्रेडमार्क देखील दाखल केला होता. तेव्हापासून या बाईकच्या लॉन्चिंगविषयी अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहेत. कंपनी नव्या बदलांसह बाजारात आणू शकते.
वर्षाच्या शेवटी लाँच होण्याची शक्यता :
आपल्या देशात 125 सीसी बाईकची बाजारपेठ ही खूप मोठी आहे, ज्या बाइकमध्ये जास्त पॉवर, स्टाईल आणि मायलेज असतात अशा वाहनचालकांनी 125 सीसी बाईक घेणे खूप पसंत केले आहे. सध्या, होंडा, बजाज ऑटो आणि हीरो मोटोकॉर्प यासारख्या कंपन्या या विभागात बाईक बाजारात देत आहेत. अशा परिस्थितीत आणखी एक बाईक या यादीमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. ती म्हणजे टीव्हीएस या वर्षाच्या शेवटी भारतात आपले नवीन फिअरो 125 लॉन्च करण्याची शक्यता आहे.
असे असेल इंजिन :
जर आपण फिअरो 125 च्या इंजिनबद्दल सांगायचे झाले तर त्यामध्ये 125 सीसीचे इंजिन, एअर-कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते, जे 12 बीएचपीची शक्ती देईल. या व्यतिरिक्त हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह असेल. सुरक्षिततेसाठी, ही बाईक ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक पर्यायांसह येऊ शकते. टीव्हीएसच्या या नवीन बाईकमध्ये मायलेजचीही काळजी घेतली जाऊ शकते. स्मार्ट स्क्रीनचा वापर देखील यात होऊ शकतो.