सेकेंड जनरेशन म्हणून ओळखली जाणारी Mahindra Thar SUV ला ग्राहकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. ही गाडी लाँचिंगच्या ९ महिन्यांनंतरही भारतातील बाजारात धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळते.या भारतीय ऑफ-रोड एसयूव्हीने ५५,००० बुकिंग्स मिळविले आहेत. या SUV ला दरमहा सरासरी ५००० बुकिंग्स मिळत आहेत. एप्रिलमध्ये महिंद्राने आहे जाहीर केले आहे की, त्यांनी महिंद्रा थारच्या ५०,००० बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे. तसेच या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटला जास्त मागणी आहे.
महिंद्रा थार या गाडीचे दोन वेगवेगळे व्हेरिएंट आहेत. एक ऑटोमॅटिक तर दुसरा मॅन्युअल. या कारची खूप जोरदार विक्री बाजारात सुरु आहे. महिंद्रा थारच्या एकूण विक्रीत ऑटोमॅटिक कारचे योगदान ४७% एवढे आहे. नवीन थार एसयूव्ही २०२० ऑक्टोबर मध्ये लाँच करण्यात आली होती. ४X४एसयूव्हीची सुरुवातीची किंमत १२.११ लाख रुपये इतकी होती,तर या कारच्या टॉप मॉडेलची किंमत १४.१६ लाख रुपये इतकी आहे.सेकंड जनरेशन महिंद्रा थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेले दोन्हीही पर्याय यात देण्यात आले आहेत.