केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आज दुपारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करणार आहे. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईसह सर्व राज्य मंडळांना दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. त्याचवेळी सीबीएसई २०२१ बारावीचा निकाल जाहीर झाला. आज अखेर CBSE दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
अशा प्रकारे बघा 2021 CBSE 10 वीचा निकाल :
१) सर्वात पहिल्यांदा cbseresults.nic.in किंवा cbse.nic.in या वेबसाइटवर जा.
२)CBSE Class 10 Result 2021 या लिंकवर क्लिक करा.
३)आपला रोल नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरून लॉगिन करा.
४) CBSE वर्ग 10 निकाल 2021 डाउनलोड करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
५) निकाल डाउनलोड झाला की त्याची प्रिंटआउट घ्या.