राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यामधील स्थानिक पातळीवरील वाद पुन्हा एकदा रणांगणावर आले आहेत. पुण्यातील स्थानिक पातळीवरील महा विकास आघाडीकडून कमिटी व समित्या तयार करण्यात आल्या आहेत त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला कोणतेही स्थान दिले जाणार नाही असे सांगितले आहे. यावर पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर तक्रार मांडली आहे.
रमेश बागवे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना या प्रकारच्या समस्यांना सारखे तोंड द्यावे लागत आहे.
काँग्रेसला कोणत्याही समित्यांमध्ये सामील करून घेतलं जात नाहीये असेही रमेश बागवे म्हणाले. याला पाठिंबा अजित पवारांचा असल्यामुळे, त्याबाबतची तक्रार नाना पटोले यांच्याकडे केली गेली आहे. माध्यमांशी बोलताना नाना पटोले असे म्हणतात की पुणे काँग्रसचे शहराध्यक्ष रमेश बागवेंनी राष्ट्रवादीचे नेते स्थानिक कमिटींच्या निवडीमध्ये स्थान देत नाहीत अशी तक्रार मांडली आहे.