देशात प्राणघातक कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही सुरूच आहे. गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची ४२ हजार ९८२ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी ५३३ लोकांचा मृत्यू झाला. देशात या कोरोना विषाणूच्या आजारामुळे आतापर्यंत ४ लाख २६ हजार २९० लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना ॲक्टिव रूग्णांची आकडेवारी अजूनही वाढतच आहे. उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या रूग्णांची संख्या ही 3 कोटी 9 लाख 74 हजार आहे.
मुंबईत गेल्या २४ तासात २६३ कोरोना रुग्ण :
गेल्या २४ तासात मुंबईत २६३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या समोर आली आहे. तर ४३८ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत ७,१३,१६१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्याच्या परिस्थितीत मुंबईतील रिकव्हरी रेट ९७% आहे. मुंबईत मागील २४ तासात
९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.