सफेद केस एकंदरीत आपल्या लुक वर देखील परिणाम करतात. केस पांढरे पडण्याचे कारण बदलती जीवनशैली आहेच. अनेक कारणे यातच दडलेली आहेत. जसे की टेन्शन घेणे, सतत ताण तणावात राहणे, चुकीचा आहार घेणे, व्यसन करणे अशी एक ना अनेक कारणे केस पांढरे होण्याला कारणीभूत असू शकतात. पांढरे केस नैसर्गिक उपाय वापरून पुन्हा काळे होऊ शकतात. पांढऱ्या केसांना काळे करण्याचे दोन खास उपाय जाणुन घेऊया.
आवळ्यामुळे केसांमध्ये नॅच्युरल पिग्मेंट वाढते. रात्री झोपण्याआधी १० ते १२ चमचे आवळा पावडर किंवा एक मुठभर सुके आवळे दोन कप पाण्यात भिजत ठेवण्यासाठी एका लोखंडाच्या भांड्यात ठेवावेत. जर तुम्ही सुके आवळे भिजवले असतील तर सकाळी ते मिक्सरला वाटून घ्या. एक कप पेक्षा अधिक प्रमाणात आवळा मिश्रण घेतले असेल तर प्रत्येक कपच्या हिशोबाने दोन चमचे कॉफी पावडर आणि तीन चमचे लिंबू रस मिक्स करा. या पेस्टला अशा पद्धतीने आपल्या केसांवर आणि केसांच्या मुळांशी लावा की जेणेकरून पूर्ण केसांमध्ये ही पेस्ट लागेल. दोन तास तरी ही पेस्ट केसांना लावून ठेवा आणि मग ताज्या व स्वच्छ पाण्याने केस धुवा. केस धुताना शॅम्पू लावू नये.