मालिका तसेच चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेता अनुपम श्याम ओझा यांचे निधन झाले आहे. अनुपम यांना अनेक दिवसांपासून किडनीचा विकार होता. सध्या ते व्हेंटिलेटरवर होते.अनुपम श्याम मुंबईतील लाइफलाइन मेडिकेअर रुग्णालयात मागील ४ दिवसांपासून ऍडमिट होते. मागील काही महिन्यांपासून ते डायलिसिसवर होते.
अभिनेता अनुपम श्याम यांनी अनेक टीव्ही आणि चित्रपटात काम केली आहेत.मन की आवाज ‘प्रतिज्ञा’ मधील ठाकुर सज्जन सिंह ही त्यांनी साकारलेली भूमिका चांगली गाजली होती. ‘प्रतिज्ञा’ २ मध्ये पण ते काम करत होते.
अनुपम श्याम यांनी क्योंकि जीना इसी का नाम है, हम ने ली है शपथ आणि डोली अरमानों की यासारख्या अनेक लोकप्रिय शो मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.त्यांनी परजानिया, लगान, दिल से, नायक: द रियल हीरो और ऑस्कर विजेता फिल्म स्लमडॉग मिलियनेयर सारख्या चित्रपटात अभिनय केला आहे.