सकाळचा आपला नाश्ता म्हणजे चहा आणि बिस्किटे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बिस्किटे खूप आवडतात. हल्ली बाजारात बिस्किटांचे असंख्य प्रकार आले आहे. परंतु जास्त बिस्किटे खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते.
१) डायजेस्टिव बिस्किटात मैद्याऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर केला जातो.ग्लुटेनच्या अतिप्रमाणात केलेल्या सेवनाने पोटदुखी, गॅस, अॅसिडीटी, डायरिया व जुलाब यांसारख्या समस्या होऊ शकतात.
२) डायजेस्टिव बिस्किटांमध्ये सॅच्युरेटेड फॅट व फॅटच्या दुस-या पर्यायांचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचं सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल व गैस्ट्रोइंटेस्टाइनलशी निगडीत आजारांचं शिकार होण्याचा धोका वाढतो.
३) डायजेस्टिव बिस्किट हे दुस-या बिस्किटांच्या तुलनेत कमी गोड असतात. पण यामध्ये नैसर्गिक स्वीटनर्ससोबतच साखरेचाही वापर केला जातो. ही बिस्किटं शुगरलेस नसतात.
४) बिस्किटाचा स्वाद वाढवण्यासाठी व हलकंसं नमकिन बनवण्यासाठी यामध्ये सोडियम मिक्स केलं जातं. सोडियमचं जास्त प्रमाण हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन व स्ट्रोक सारख्या जीवघेण्या आजारांचं कारण बनतं.