आचार्य चाणक्यांना भारतातील उत्कृष्ट विद्वानांमध्ये मोजले जाते. चाणक्य धोरणात त्यांनी आपले जीवन जगण्याची अनेक कला,गोष्टी देखील सांगितल्या आहेत. चाणक्यांच्या मते, जीवन साध्या,सोप्या,मार्गाने जगायला हवे. यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद येतो. आजच्या काळात माणूस अनेक समस्यांमध्ये अडकलेला आहे. काही वेळा अनेक व्यक्ती तणाव आणि समस्यांमधे अडकून आयुष्याचा आनंद घेण्यास सक्षम नसतात. राग, लोभामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कठीण आणि गुंतागुंतीचे होते. ज्यामुळे जीवनाचा खरा हेतू समजत नाही.
दरम्यान, जेव्हा एखादी व्यक्ती सत्यापासून दूर असते तेव्हा त्या व्यक्तीच्या अनेक अडचणी वाढू लागतात. पण या परिस्थितीत काही समजत नाही. जोपर्यंत त्याला समजते, तोपर्यंत त्या गोष्टीला बराच उशीर झालेला असतो. गोंधळामुळे, व्यक्ती सत्य आणि असत्य यातील फरक करण्यास अक्षम राहते आणि नंतर त्याला अडचणींचा सामना करावा लागत असतो. म्हणून, प्रत्येक परिस्थितीत सत्याचा मार्ग स्वीकारा पाहिजे. लोभ आणि क्रोधामुळे जीवनाचा आनंद नष्ट होतो. लोभामुळे एखादी व्यक्ती आपला आनंद गमावते. म्हणून लोभ हा सर्व प्रकारच्या दुःखाचा मूळ आहे. म्हणून प्रत्येकाने लोभापासून दूर रहावे.