कोवीड १९ चा विविध लाट अनेक देशात चालू आहेत. या दरम्यान पोस्ट कोविड लक्षणांवरील संशोधनातून एक आश्चर्यकारक अहवाल समोर आला आहे. त्यानुसार कोविडवर मात केल्यानंतर बरं झालेल्यांना अजून एक समस्या जाणवतेय या व्यक्तींना विचार करण्यात आणि एकाग्र होण्यात अडचणी येत आहेत. इतकंच नाही तर स्मरणशक्ती कमी होण्याची लक्षणंही अनेक लोकांमध्ये दिसून आली आहेत.
दरम्यान, संशोधन करणाऱ्यांच्या मते, अभ्यासात अनेक पैलू तपासण्यात आले. या दरम्यान असे आढळून आले की कोरोनामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होत आहे. असं लक्षात आलं की, मेंदूवर कोविडचे काही महत्त्वपूर्ण परिणाम होतात आणि ज्यासाठी अजून संशोधनाची आवश्यकता आहे.