सर्वांचा आवडता मेसेजिंग अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. व्हॉट्सअॅप नेहमीच त्याच्या युजर्स साठी कोणते तरी नवीन फिचर्स घेऊन येत असते. त्यामुळे व्हॉट्सअॅपचे युजर्स वाढतच चालले आहे.बरेचदा आपल्याला एकच मेसेज अनेकांना पाठवायचा असतो. यासाठी अनेक युजर्स हे एक-एक कॉन्टॅक्ट सिलेक्ट करतात आणि मेसेज पाठवतात.
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सला न्यू ब्रॉडकास्ट नावाचे एक फिचर्स देते. त्याच्या मदतीने तुम्ही २५६ लोकांना एकाचवेळी संदेश पाठवू शकता. त्यासाठी प्रथम तुमचा व्हॉट्सअॅप उघडा. यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील, त्यावर क्लिक करा.आता यात अनेक पर्याय तुमच्या समोर येतील, त्यापैकी तुम्हाला न्यू ब्रॉडकास्ट हा पर्याय निवडावा लागेल.तुम्ही न्यू ब्रॉडकास्ट वर क्लिक करताच कॉन्टॅक्ट लिस्ट तुमच्या समोर येईल.आता तुम्हाला ज्यांना मेसेज पाठवायचा आहे ते निवडा.हे केल्यानंतर तुमच्या समोर एक चॅट विंडो येईल.आता तुम्ही शेवटी जो काही संदेश पाठवाल, तो तुम्ही त्या सर्वांना ग्रीन टीकवर क्लिक करून पाठवू शकता.
व्हॉट्सअॅप च्या या नव्या फिचर चा सर्वांना खूप उपयोग होईल.