आपण आपल्या चेहर्याबद्दल नेहमी सक्रिय असतो. चेहर्याची खूप काळजी घेतली जाते. त्यासाठी विविध क्रीम्स, फेसवॉश, मेक अप चा वापर केला जातो. त्याचप्रकारे आपण आपल्या हाता- पायांची देखील काळजी घेतली पाहिजे. बर्याचदा आपल्या चेहर्याची त्वचा आणि हाताची त्वचा मॅच होत नाही. अशावेळी आपल्याला काही काळजी घेणे गरजेचे असते.
१) बाहेर जातांना सनकोट किंवा सनस्क्रिन लोशन वापरावे. तसेच महिन्यातून किमान एकदा तरी मॅनिक्युअर करावे. त्यामुळे आपली हाताची त्वचा सुदंर आणि मुलायम दिसते.
२) हातांचा मसाज कसा करावा :मसाज खालून वरच्याच्या दिशेने करावा. बोटापासून वरच्या बाजूला एका मागे एक हात गोलाकार फिरवावा. अंगठ्याला गोलाकार मसाज करावा. बोटांचा चांगल्याप्रकारे मसाज झाल्यावर हात मागच्या दिशेने घेऊन मसाज करावा.मनगटला गोलाकार मसाज करावा. म्हणजे बॅंगल स्टेप करावी. नतंर हातांना झटका देऊन हात मोकळे करावे.
३) मॅनिक्युअर कसे करावे?
१.प्रथम कापूस व नेल रिम्युअरच्या साहाय्याने आधीची नेल-पॉलिश काढून टाकावी. काडीने किंवा स्ट्रिकने नखांच्या कोपर्यातील कलर नीट काढून नखांना आकार द्यावा.
२.मग काडीला कापसाचे आवरण करुन नखाच्या आवतीभोवती असलेली जाड स्किनला लावावे, की ज्यामुळे ती जाड स्किन मुलायम होते. स्किन काढून टाकावे, ज्यामुळे नखांची वाढ चागंल्याप्रकारे होते.
३.आता गरम पाण्यात शॅम्पू व हायड्रोजन पॅरॉक्साईड टाकून थोडा वेळ म्हणजे २-३ मिनिट हात पाण्यात बुडवून ठेवावेत. नंतर ते ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करावे.