२६ नोव्हेंबर २००८ हा दिवस प्रत्येक मुंबईकरांच्या आयुष्यातील भयानक दिवस होता. या दिवशी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले आहे. हा भयंकर दिवस मुंबईकर कधीही विसरणार नाही. पण या दिवशी आपल्या आयुष्यातील खरे हिरो डॉक्टर्स, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी व रुग्णालयातील कर्मचारी यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत.
आपल्या आयुष्यातील खऱ्या हिरोंनी २६ नोव्हेंबर २००८ च्या दिवशी केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल ‘मुंबई डायरीज २६/११’ हा शो भाष्य करणार आहे. ‘मुंबई डायरीज २६/११’ या शोचे निखिल अडवानी आणि निखिल गोंसाल्वीस हे दिग्दर्शक आहेत. तसेच या शोची एमी एंटरटेंमेंटच्या मोनिशा अडवानी आणि मधु भोजवानी यांनी निर्मिती केली आहे. कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलवडी हे आपले आवडते कलाकार या शो मध्ये दिसणार आहेत. या शो चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ९ सप्टेंबर २०२१ रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओज वर २४० हुन अधिक देशांमध्ये व प्रदेशांमध्ये हा शो प्रदर्शित होणार आहे.