मार्च २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व औषधोपचारावर महापालिकेने तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला असल्याने या खर्चामध्ये आणखी वाढ होणार आहे.
दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती, वैद्यकीय उपकरणांची खरेदी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वास्तव्यास असलेल्या हॉटेलचा खर्च, बाधित क्षेत्रामध्ये धान्य पुरवठा आदी कामांसाठी महापालिकेने १६०० कोटी रुपये खर्च केले आहेत, तसेच मास्क खरेदी, ऑक्सिजन प्लांटची निर्मिती, औषधींची खरेदीदेखील करण्यात आली. यासाठी महापालिकेने आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.