तज्ज्ञांच्या मते देशात तिसरी लाट येण्याची शक्यता कमी होते आहे. जरी ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेप्रमाणे विनाशकारी आणि प्राणघातक असणार नाही. केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने मात्र यावर टिप्पणी करणे टाळले आहे. पण, काही सदस्यांनी सांगितले की, तिसरी लाट येऊ शकत नाही. जरी आली तरी ती मोठ्या प्रमाणात पसरणार नाही.
दरम्यान, ऑगस्टच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र आणि केरळातही रुग्ण वेगाने कमी होऊ शकतात. तुरळक राज्य वगळता बहुतांश राज्यात आज मृत्यू होत नाहीत. ऑगस्ट अखेरपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारपर्यंत कमी होऊ शकते. ऑगस्ट अखेरपर्यंत लसीकरण ६५ कोटींपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे मृत्यू व हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून बचाव होऊ शकतो.