केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर महाड कोर्टानं काल रात्री त्यांना जामीन दिला. याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राणेंना आता पुन्हा अटक करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
तसेच राणेंना महाडमध्ये त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद असल्यानं महाड पोलिसांनी त्यांना अटक केली होती. रात्री उशिरा त्यांना महाड कोर्टानं जामीन मंजुर केला. त्यांना आता पुन्हा अटक करण्याची गरज नाही. आम्ही अटकेच्या आदेशात बदल करुन त्यांना फक्त जबाब नोंदविण्यासाठी २ सप्टेंबरपर्यंत नाशिक पोलीस ठाण्यात हजर राहावं लागणार आहे. यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं आणि राणेंनीही सहकार्य करण्यास तयारी दाखवली आहे. मंत्री महोदयांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचं आम्ही स्वागत करतो, असं नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले.