ड्राय फ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन्स, मिनरल्स आणि प्रोटिन्स असतात. ड्रायफ्रुट्सचा वापर खीर, पुलाव, लाडू तयार करण्यासाठी केला जातो. गणेशोत्सवात वेगवेगळे नैवेद्याचे पदार्थ तयार करण्यासाठी ड्रायफ्रुट्स तयार केले जातात. नैवेद्याचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी ड्रायफ्रुट्स घालताना काही गोष्टींची काळजी घ्या.
१) जेव्हाही तुम्हाला ड्राय फ्रुट्स वापरायचे असतील तेव्हा एक तास आधी ते फ्रिजमध्ये ठेवा. थंड ड्रायफ्रुट्सना मऊपणा येतो त्यामुळे कापायला किंवा किसायला सोपं पडतं.
२) जर तुम्हाला बदामाची सालं काढून टाकायची असतील तर काही तास पाण्यात भिजवून ठेवा जेणेकरून सालं सहज निघण्यास मदत होईल.
३) गरम पाण्यात बदाम भिजवल्यास लवकर फुगतील आणि सालं काढणं सोपं होईल.
४) काजू तोडण्यासाठी तुम्ही त्याच्या वरच्या भागाला दाबा त्यानंतर काजूचे २ तुकडे लगेच होतील.
५) खीर तयार करताना सगळ्यात शेवटी मनुके घाला. आधी घाल्यास दूध फाटण्याचा धोका असतो.