author

सारेच पोल तोंडावर का आपटले? पोलखोल…

निवडणूकपुर्व आणि निवडणूकोत्तर पोल विविध संस्था वर्षानुवर्षे करीत आलेल्या आहेत. हे एक शास्त्र आहे. जर का प्रातिनिधिक नमुना घेतला गेला तर हे अंदाज निकालांशी बरेच जुळतात असा आजवरचा अनुभव आहे. एखाद्या दुसर्‍या संस्थेची पाहणी चुकणं किंवा काहींचे थोडेफार अंदाज चुकणं हेही समजून घेता येते. या निवडणूकीत मात्र सगळ्याच संस्था तोंडावर पडल्या. या पोलचा पोलखोल कुणीतरी […]

मोबाईलमग्न बहुजन नाटक आणि ग्रंथांकडे का वळत नाहीत?

आज बहुजन समाज शिकून सवरून महत्वाच्या पदांवर पोचलाय. काहींचे पगार इतके मुबलक आहेत की त्या पैशांचं काय करावं असा त्यांना प्रश्न पडतो.शिक्षक, प्राध्यापक, सरकारी अधिकारी, खाजगी क्षेत्रातील पगारदार अशा बहुजनांची राज्यातली संख्या किमान १ कोटी असावी. हा समाज शिकला सवरला पण पुस्तकांकडे वळला नाही. यातल्या ९९% लोकांच्या घरी एकही पुस्तक आढळणार नाही. ही माणसं मॉलमध्ये […]

सरकारने शिवरायांचा इतिहास का वगळला?- प्रा.हरी नरके

बालभारतीचे इयत्ता ४ थीचे पुस्तक छ. शिवरायांच्या इतिहासाचे असून ते अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय सध्या चर्चेत आहे. त्यावर कडाडून टिका झाल्यावर इ. ६ वीच्या पुस्तकात शिवराय असतील असा साळसुद खुलासा करण्यात आला. मग हे आधीच का केले नाही? सहावीचे पुस्तक आल्यावर मग इ. ४ थीचे पुस्तक रद्द का केले नाही? आता ही पश्चातबुद्धी का? प्रत्यक्षात यामागे […]

आधुनिक भारताचे निर्माते : गांधी आणि आंबेडकर

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन समकालीन, दिग्गज राष्ट्रीय नेत्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होते. दोघांची भक्त मंडळी मात्र या संबंधांचे सुलभीकरण करून ते कसे एकमेकांचे विरोधक होते, कडवे टिकाकार होते याचीच एकतर्फी मांडणी करीत असतात. या दोन्ही छावण्यांमध्ये एकमेकांबद्दल अढी आहे. आकस आहे. द्वेषही आहे. खरंतर आता त्या दोघांना जाऊन सहासात दशकं उलटून गेलेली […]

राधाकृष्णन भांडारकरच्या निवडणुकीत पराभूत झाले होते

५ सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्याने शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटीश सरकारचे निष्ठावंत म्हणून त्यांना “सर” हा किताब देण्यात आला होता. आयुष्यातील बहुतेक सगळा काळ त्यांनी परदेशी विद्यापिठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यात घालवला. त्यांनी २ टर्म भारताचे उपराष्ट्रपती आणि एक टर्म राष्ट्रपती म्हणूनही काम पाहिले. ते अपक्ष असूनही या पदांवर नियुक्त […]

लोकमान्य टिळक कोण होते?- प्रा. हरी नरके

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची जयंती आहे. १ ऑगष्ट २०१९ पासून त्यांचे स्मृतीशताब्धी वर्ष सुरू होत आहे. लोकमान्य टिळक हे आधुनिक भारतातले देशभर पोचलेले पहिले राष्ट्रीय नेते होते. एका मराठी माणसाने हे स्थान मिळवावे ही गौरवाची बाब होय. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक वर्षे तुरूंगवास भोगला. ते फार मोठे पत्रकार-संपादक-लेखक-विचारवंत होते. सार्वजनिक गणेशोत्सवाचे ते एक प्रवर्तक […]

पुस्तकं महाग करून मोदी सरकारने लावला वाचन संस्कृतीला हातभार

परदेशातून येणार्‍या पुस्तकांवर मोदी सरकारने ५ टक्के सीमाशुल्क लागू केले आहे. त्यामुळे यापुर्वी २ किंवा तीन हजार रूपयांना मिळणारे पुस्तक शंभर ते दीडशे रूपयांनी आता महाग होईल. त्यामुळे पुस्तक खरेदीत वाढ होईल. वाचन संस्कृतीचा विकास होईल. आजवर न वाचणारे, ग्रंथ खरेदी न करणारे तमाम भारतीय प्रचंड मोठ्या प्रमाणात पुस्तकं विकत घेऊ लागतील. महारष्ट्रासारख्या अतिप्रगत राज्यात […]

सामाजिक विषमतेचा दाहक अनुभव ‘आर्टीकल १५’

आर्टीकल १५ हा चित्रपट मुख्य धारेतला आजचा चित्रपट आहे. मुख्य म्हणजे हा अनुबोधपट किंवा भाषण नाही. एक क्राईम थ्रिलर वाटणारा हा चित्रपट आजच्या भारतातील जातीभेदातून येणार्‍या पक्षपात, भेदभाव शोषण आणि हिंसा यांचा जळजळीत अनुभव देतो. अनुभव सिन्हांसारखा मुख्य धारेतले मुल्कसारखे संवेदनशील विषयावरील चित्रपट बनवणारा दिग्दर्शक हा चित्रपट बनवतो आणि तरूण प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर तो पहायला […]