विद्याताईंच ते ‘भाषण’ आणि मी…

साल आता नेमकं आठवत नाही. पण 1997 असावं. आमच्या पुसदच्या वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाने (वत्सलाबाई या माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पत्नी. आज विदर्भातलं मुलींसाठीचं ते एक उत्तम कॉलेज म्हणून ओळखलं जातं.) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रावर यांनी पुढाकार घेऊन पुसदमध्ये चौथे वैदर्भिय लेखिका संमेलन आयोजित केलं होतं. त्यावेळी विद्याताई त्या संमेलनाच्या उद्घाटक होत्या. […]

संक्रांत आणि पानिपत महायुद्ध

दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. उभा मराठा कापला गेला तो आजचाच दिवस. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला. युद्ध म्हटले कि त्याची परिणती विजय किंवा पराभव. पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का.? मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले, म्हणून गारद्यांचा […]

मी आहे रे….

क्षणभर थांबूया आणि विचारपूस करूया दगदगीच्या संसारातून थोडा वेळ काढूया व्हाट्सएप फ़ॉर्वर्डपेक्षा थेट कॉलवर बोलूया स्टेटसमधून व्यक्त न होता प्रत्येक्षात भेटून बोलूया माणसात माणूस भेटत नाही म्हणून आपण प्राण्यांना दोस्त बनवतोय, पण आपण स्वतः किती माणसात रमतोय, हे देखील पाहूया क्षणभर थांबूया आणि विचारपूस करूया दगदगीच्या संसारातून थोडा वेळ काढुया… तू असशील रे हुशार, आयुष्यातले […]

तू आणि मी

किनाऱ्यापासून थोडे दूरच लाट येते, उसळते, माघार घेते क्षणात फेसाळते, किती पटकन शांत होते तू हसतोस, दूर होतोस मी अधीर, मन बधिर, चरफडते समुद्र उधाणला असतो माझ्या मनात हिरमुसते, लटकंच रुसते तू जाणवतोस मग हातात, शांत होते, क्षणात तुझे इरादे मग मनगटावर उमटलेली बोटंच स्पष्ट करतात तुला नजर द्यायची काय बिशाद? माझे डोळे इथे हरतात […]

आशा

कुठुन तरी एक आशेचा किरण येतो, आणि आयुष्य उजाळून टाकतो नैराग्यतेने माथरलेल्याच्या आयुष्यात, नवचैतन्य घेऊन येतो जीवन प्रकाशमय करतो, जेव्हा सर्व काही संपले असे वाटते, तेव्हा मदतीला आशेचा किरणचं येतो. कधी कधी आपण विचार करतो की आपण ताण तणाव, नैराश्यता आणि आपल्यावर आलेल्या कठीण अडचणी यांच्या सामोरे कसं जायचे या विचाराने त्रस्त असतो.आपल्याला वाटते आपण […]

तरच वेदना अजरामर होईल…

वेदनेची उस्तवार करतात सगळेच रुतून राहिलेल्या वळाची खुणा बनलेल्या जखमेची आतल्या आत दुखत असल्याची वेदनेची उस्तवार करतात सगळेच त्यानं दु:ख हलकं होतं म्हणतात… पुन्हा सापेक्षभाव, पुन्हा वाटणं, समजणं पण आता हे पुरे झालं- गोधडी शिवताना लागलेली दाभण आणि आलेलं थेंबभर रक्त कुठल्या प्रदर्शनात ठेवतो आपण? आपले आपले म्हणताना दगा देऊन गेलेल्या नात्यांना कधी लिलावात विकतो […]

बरं झालं मी मुलगा आहे

बरं झालं मी मुलगा आहे असतो मी मुलगी तर धरलं असतं त्यांनी मला रस्त्यावरून एकटी चालताना मी रडले असते ओरडले असते मोठ्याने किंचाळले असते त्या ताईंनी, माताजींनी अन त्या देवींनी सत्संगमध्ये सांगितलं होतं मुलीने नाजूक असावं तिच्या अंगात पुरुषी घमंड नसावा मी ओरडून रडून थकले असते कपड्यांना फार जपणारी मी पण त्यांनी माझे कपडे फाडले […]

अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातलं नोबेल जाहीर

जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिजित बॅनर्जी, इस्थर डफलो, मायकल क्रेमर अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याआधी अर्थशास्त्रातला नोबेल देऊन अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना देण्यात आला होता. […]

स्वार्थाचा वणवा

कसे जंगल हिरवेगार, मखमल हिरवी जणू छान. शोभे कशी तिथे माझ्या शंकराची पिंडी, नका बांधू रे तिथे या कॉंक्रिटच्या भिंती……. कसा फुले हा झरा निसर्गाचा, येणारा आवाज तिचा हृदयाचा. मनसोक्त तिथे तिला मारू द्या उसंडी, नका बांधू रे तिथे या कॉंक्रिटच्या भिंती. उंच झाडे कसे रेषेत चाले, दाटीवाटीने उभे ते आभाळाशी बोले. चालली जणू माझ्या […]

शेषराव मोरे यांना संस्कार भारतीचा राज्यस्तरीय वाङ्ममय पुरस्कार जाहीर

राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय ‘स्व. कल्पना व्यवहारे’ उत्कृष्ट वाङ्ममय पुरस्कार असे या पुरस्काराचे नाव आहे. ,पंधरा हजार रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक 15 सप्टेंबर 2019 रविवार रोजी , दुपारी 4 वाजता ,नरहर कुरुंदकर सभागृह […]