ठाण्यातील पुनर्विकासाचे काम जलदगतीने करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुबई : ठाणे शहरातील सार्वजनिक बांधकाम आणि ठाणे तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. या कार्यालयाच्या पुनर्विकासाचा एकत्रित प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील सागरीमहामार्ग साठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू असून जमीन मालकांना १०० टक्के मोबदला देण्यासाठी महसूल, नगरविकास आणि ठाणे महापालिका यांनी […]

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दाऊद बाग येथील चौकाचे उद्घाटन

मुबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जे.पी. रोड, अंधेरी मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उदघाटन सोहळा संपन्न झाला. या चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. दरम्यान, नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य […]

संयुक्त राष्ट्रसंघाने मुंबईला ‘ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड’ म्हणून मान्यता दिली आहे

मानवी हस्तक्षेपामुळे हवामानात बदल होत असल्याच्या निराशाजनक अहवालांमध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) ‘जगातील वृक्ष शहरांमध्ये’ मुंबईची निवड केली होती. हा पराक्रम अधिकच थक्क करणारा ठरतो. हे शहर 21 देशांतील 138 शहरांच्या गटांपैकी एक होते, जे जलद-विकसनशील शहरी जंगलांमध्ये हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी ओळखले गेले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) उद्यान विभागाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईला […]

मुंबईत दहशतवादी हल्ल्यांची धमकी, दहशतवादी ट्रेनवर हल्ला करू शकतात,अलर्ट जारी !

अलीकडेच दिल्ली स्पेशल सेलने ६ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील एक आरोपी मुंबईतील धारावी परिसरातील रहिवासी आहे. दिल्ली स्पेशल सेलच्या सूत्रांनी सांगितले की, अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांना मुंबईच्या लोकल ट्रेनसह देशातील विविध भागात दहशतवादी कट रचण्याची इच्छा होती. सूत्रांनी असेही सांगितले आहे की, रेल्वे पोलिसांना म्हणजेच जीआरपीला एजन्सींकडून संभाव्य दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली होती. […]

मुंबईत निर्माणाधीन मेट्रो पूल कोसळून २१ जण जखमी !

मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात मेट्रोच्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचा एक भाग कोसळल्यानंतर मोठा अपघात झाला आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे ४.४० च्या सुमारास झाला आहे. येथे रात्री मेट्रोचे काम चालू होते. या अपघातात २१ जण जखमी झाले असून त्यांना विंदेसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी काही लोक अडकल्याची भीती आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणावर पोलीस दल […]

कोरोना योद्ध्यांसोबत रक्षाबंधन…

ठाण्यातील आसरा समूहाद्वारे मागील ४ वर्षांपासून रक्षाबंधन सोहळा कळवा येतील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल तसेच नवी मुंबई येथील राजमाता जिजाऊ रुग्णालय येथील रुग्णांसोबत साजरा करण्यात येतो. कोरोना महामारीमुळे सध्याची परिस्थिती पाहता या वर्षी रक्षाबंधन सोहळा रुग्णालयात करणे शक्य झाले नाही. दरम्यान, यावर्षी हा सोहळा कोरोनाच्या महामारीत जे कोरोना योद्धा (सफाई कर्मचारी […]

महालक्ष्मी किचन पुरवतेय अनेकांना जेवण…

कोरोना संकटकाळाचा सामना सर्वच प्रशासकीय व्यवस्था, नागरिक तसेच सामाजिक संस्था आपल्या पद्धतीने करत आहेत. अनेक महानगरपालिका आपल्या कार्यक्षेत्रात अडकुन असलेल्या तसेच गरजूंच्या मदतीसाठी कम्युनिटी किचनच्या माध्यमाने नागरिकांसाठी जेवणाची सोय करत आहे. कल्याण शहरांतील महालक्ष्मी भोजनालयचे श्री कुटुंब हे कम्युनिटी किचन १४ एप्रिल पासुन सुरू असुन आजवर एक लाखापेक्षा जास्त लोकांना जेवण देण्यात आले आहे. मुख्य […]

बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपयोगात येणारे मास्क आणि सॅनिटायझर्सची विनापरवाना तसेच बनावट उत्पादने तयार करणाऱ्यांवर तसेच विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली असून आतापर्यंत राज्यातील विविध भागात 20 छापे टाकून सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा – मुख्यमंत्री

पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये गुन्हेगारांपेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असले पाहिजे. गुन्ह्यांची उकल करण्यासह संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा तसेच त्यांच्या तंत्रांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे, असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिला. दरम्या, दहशतवाद तसेच नक्षलवादाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी आणखी कठोर तयारी करावी, असेही ते यावेळी म्हणाले. पोलीस मुख्यालयात […]