ठाण्यातील पुनर्विकासाचे काम जलदगतीने करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुबई : ठाणे शहरातील सार्वजनिक बांधकाम आणि ठाणे तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. या कार्यालयाच्या पुनर्विकासाचा एकत्रित प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील सागरीमहामार्ग साठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू असून जमीन मालकांना १०० टक्के मोबदला देण्यासाठी महसूल, नगरविकास आणि ठाणे महापालिका यांनी […]

मेट्रो 4 प्रकल्पासाठी ठाण्यातील 270 एकर भूखंड आरक्षित

वडाळा आणि ठाणे यांना जोडणाऱ्या मेट्रो 4 प्रकल्पासाठी पिकनिक सेंटर आणि ग्रीन झोनमधून ठाणे शहराच्या हद्दीतील 270 एकरचा भूखंड आरक्षित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमांतर्गत आरक्षण बदलण्याची सूचना प्रसिद्ध केली आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) द्वारे राबविण्यात येत आहे आणि मेट्रो 4 नंतर वडाळा […]

महाराष्ट्र बर्ड फ्लूची भीती: ठाण्यापाठोपाठ पालघरमधील नमुने एव्हीयन इन्फ्लूएंझा पॉझिटिव्ह आढळले

महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूची प्रकरणे नोंदवल्यानंतर काही दिवसांनी, त्याच्या शेजारच्या पालघर जिल्ह्यातील वसई-विरार भागातील एका पोल्ट्री फार्ममध्येही संसर्ग आढळून आला. पोल्ट्री फार्ममधील काही पक्षी मरण पावले होते, त्यानंतर त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. चाचणीच्या निकालात पक्ष्यांना H5N1 विषाणू आढळल्याची पुष्टी झाली, असे पालघरचे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कांबळे यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. […]

मुंबई, एमएमआरने तिसऱ्या लाटेचे शिखर पार केलेले दिसते

मुंबई: मुंबई, त्याच्या आजूबाजूच्या भागांसाठी काय दिलासादायक ठरू शकते, महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शहर, ठाणे, रायगड आणि पालघर यांनी कोविड -19 च्या तिसऱ्या लाटेचे शिखर ओलांडले असावे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दाट लोकवस्तीच्या शहरी भागात तिसऱ्या लाटेने शिखर ओलांडल्याने महाराष्ट्रातील परिस्थिती स्थिर होऊ शकते. तथापि, इतर क्षेत्रांमध्ये अद्याप शिखर गाठणे बाकी आहे, […]

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी बत्ती गुल; ट्विटरवर Power Cut ट्रेंड सुरू

मुंबई- ठाणे- नवी मुंबईतील अनेक भागात विज पुरवठा खंडित झाली आहे. मुंबई उपनगरातील मुलुंड, गोरेगाव, ठाणे, चेंबूर, खारघर या शहरातील नागरिकांनी सोशल मीडियावरून ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर यासंदर्भात Power Cut नावाचा ट्रेंड देखील सुरू झाला आहे. दरम्यान, टाटाकडून होणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील अनेक भागात विद्युत […]

कोरोना योद्ध्यांसोबत रक्षाबंधन…

ठाण्यातील आसरा समूहाद्वारे मागील ४ वर्षांपासून रक्षाबंधन सोहळा कळवा येतील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल तसेच नवी मुंबई येथील राजमाता जिजाऊ रुग्णालय येथील रुग्णांसोबत साजरा करण्यात येतो. कोरोना महामारीमुळे सध्याची परिस्थिती पाहता या वर्षी रक्षाबंधन सोहळा रुग्णालयात करणे शक्य झाले नाही. दरम्यान, यावर्षी हा सोहळा कोरोनाच्या महामारीत जे कोरोना योद्धा (सफाई कर्मचारी […]

येउरमध्ये सलग सहाव्या वर्षी ग्रीन गटारी उपक्रम साजरा

ठाणे | श्रावण सुरू होण्यापूर्वी आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या अथवा दिव्यांची आवस. हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला गेला आहे. बहुतांश लोक पुण्यप्राप्तीसाठी श्रावणात उपवास करतात. त्याआधी शेवटच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार करून मन तृप्त करण्याची प्रथा गेल्या काही वर्षात सुरू झाली आहे. याच कारणाने हा दिवस गटारी या नावाने लोकप्रिय आहे. गेले […]

राजनंदिनीला आई बाबांकडे सोपवताना समीक्षा यांना अश्रू अनावर…

ठाणे : कोरोनाच्या संकट काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे उपशहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांच्या रूपाने कलियुगातील यशोदा मातेचं दर्शन सर्वांना झालं आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आई बाबांच्या नवजात मुलीचा महिनाभर अगदी आईसारखी माया आणि सांभाळकरून आज समीक्षा यांनी त्यांनी या मुलीला तिच्या आई बाबांकडे सोपवलं आहे. १३ जुनला मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना रुग्णालयाने […]

कोरोनाच्या काळात ठाण्यात घरातल्या घरात ऑनलाइन फिटनेस मोहीम

ठाणे: कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्याकरिता व या संकटसमयी गरीब कुटुंबाना आधार देण्याकरिता प्ले फ्री स्पोर्ट्स इंडिया द्वारा PSI HOMEATHON – यू रन थे ईट या मोहिमेचं आयोजन दिनांक 2 मे रोजी करण्यात आले आहे . ज्या मध्ये स्पर्धकांना घरातच राहून ह्या मोहिमेत भाग घ्यायचा आहे. ही एक ऑनलाइन फिटनेस Mania आहे ज्या मध्ये सकाळी 7 […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महासन्मान सोहळ्याच्या नियोजीत तारखेत बदल

महाराष्ट्रामधील विविध सामाजिक संस्थांमार्फत “मान मराठी मनाचा” हा महासन्मान सोहळा येत्या २५ एप्रिल २०२० रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये राज्यस्तरीय पारितोषिक विजेत्यांचा सन्मान तसेच उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी, क्रीडा पुरस्कार, आदिशक्ती राजमाता पुरस्कार आदी अनेक पुरस्कारही प्रदान करण्यात येणार होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यात आली […]