The Kashmir Files आता २ राज्यात झाला टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्यांकडून कौतूक

नुकताच प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा निर्णय गुजरात सरकारने रविवारी घेतला. यासोबतच भाजपच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकारने काश्मीरी हिंदूंच्या हत्याकांडावर आधारित हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला करमुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घेतला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे आणि झी स्टुडिओजची निर्मिती आहे.

दरम्यान हा चित्रपट पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांकडून काश्मिरी हिंदू समुदायाच्या लोकांच्या लक्ष्यित हत्येनंतर खोऱ्यातून समुदायाच्या लोकांच्या पलायनावर आधारित आहे. अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांसारख्या अनेक कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.